गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

हैदराबादमधील मराठमोळी खाद्यमैफल

हैदराबादला मूळची मराठी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आता सायबराबाद झाल्यानंतर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मराठी युवा मंडळी तेथे गेली आहेत. 'मराठी टक्का' वाढल्याने हैदराबादमध्ये मराठी सणही आणखी दणक्यात साजरे होऊ लागले आहेत. नुकताच झालेला गुढीपाडवाही उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त येथील अनेक हॉटेल्सनी मराठी पदार्थांचा 'मेन्यू' ठेवला होता. हॉटेल ताज कृष्णानेही अनेक टिपीकल मराठी पदार्थ केले होते. त्यात पुरणपोळी, सूंठ पाक, श्रीखंड, बासुंदी, जिलबी हे पदार्थ आणि त्यांचा दरवळ मोहून घेत होता. ही खाद्यमैफल आम्ही वेबदुनियाच्या वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. हे पदार्थ 'ऑनलाईन (डोळ्यांनी) चाखण्याची' सोयही आम्ही या निमित्ताने केली आहे. त्याचा जरूर 'आस्वाद' घ्यावा, ही विनंती