testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ती आई आहे म्हणूनी....

- सौ. स्वाती दांडेकर

mothers day
वेबदुनिया|
'मदर्स डे'. पाश्चात्यांच्या संस्कृतीतून आपल्याकडे आलेला हा दिवस. मातेला प्रणाम करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा. हा दिवस पाश्चात्यांकडे साजरा केला जात असला तरी मुळात 'आई' ही संकल्पनाच अशी आहे, की तिच्यासाठी एखादा दिवस साजरा करणे ही औपचारिकता ठरेल. शिवाय ही संकल्पना इतकी व्यापक आहे, की तिची व्यापकताही मोजणे अवघड जावे.
भारतीय संस्कृतीतही आईचे महत्त्व अपार आहे. एखाद्या मोठ्या वृक्षाची मूळे जमिनीत दूरवर रूतलेली असतात, तशी आपल्या मनामनांत आतमध्ये खोल असते. ही मुळे आपल्या व्यक्तिमत्वाशी आत्मीयतेच्या, प्रेमाच्या बंधनांनी बांधलेली आहेत.

'आई' ही हृदयातून आलेली आहे. आपल्या जीवनावर, अस्तित्वावर प्रेमळ विश्वासाची सावली आहे. जिथे फक्त प्रेमच मिळत अस विश्वातलं एकमेव स्थान म्हणजे आई. तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता दुसरीकडे कुठेही मिळत नाही. तिच्या मायेची उब जोपर्यंत मिळते तो पर्यंत जणू चिमणीच्या घरट्याचा भास होतो. आपल्या घासातला घास आपल्याला देणारी मूर्ती म्हणजे आई. असे म्हणतात जगातलं प्रत्येक कर्ज फेडले जाते पण मातृपणातून ऋणातून कोणीच मुक्त होत नाही, अगदी देव सुद्धा नाही. अशी ही देवाची अनुपम कृती आहे.

मला माझं लहानपण आठवतं. माझी मस्ती, दंगा करणं, अखंड फिल्मी गाणं म्हणणं, बाहेर भटकणं, चिंचा, आवळा, बोरं खाणं, शाळेतून मधल्या सुटीत येऊन भातुकली खेळणं.... या माझ्या अगणित क्षणांची साक्षीदार आई आहे. लहानपणी माझी आई परिस्थितीला तोंड देण्यासाठी शाळेत नोकरी आणि शिकवण्या करायची. आपल्या मुलांनी खूप शिकावं यासाठी दिवस रात्र कष्ट करायची. माझी आई ट्यूशन करून आठ वाजता घरी यायची. त्यावेळी मी आधी वातीच्या छोट्याश्या स्टोव्हवर चहा करायला ठेवायची आणि खाली ओट्यावर बसून आईची वाट पाहायची. थोड्याशा अंतरावर विजेचा खांब होता. त्या उजेडात माझी आई मला दिसायची अन मी धावत जाऊन आईचं बोट धरून घरी यायची. आईचा चहा झाल्यावर चुलीच्या उबेत अन 25 व्होल्टच्या दिव्याचा उजेडात आमच्या गप्पा सुरू व्हायच्या.

आईच्या हाताची वरण-पोळी आजच्या पिझ्झा बर्गरापेक्षा ही अधिक चवदार होती. माझी एक मैत्रीण आहे माया तिची आई पोल्ट्री फॉर्म चालवायची. अगाध कष्ट करायची. पण त्या कष्टाची गोड फळं म्हणजे त्या माउलीची तिघेही मुलं एक डॉक्टर आणि दोघं इंजिनियर झाली.

अशी जगात अनेक उदाहरणं आहेत. आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाढवायला जगातली प्रत्येक आई सक्षम आहे. या नंतर मनात एक विचार येतो. जिच्यामुळे आपण ह्या जगात येतो, आपल्या रडण्याची 'मूक' भाषा ओळखून जी आपल्याला लहानाचं मोठं करते, जिचा हाथ धरून आपण जग पाहायला शिकतो, जिच्या छत्रछायेत आम्ही वाढतो, जगाचा सामना करतो अशा देवतुल्य मूर्तीला आपण तिच्या उतारवयात यथायोग्य मानसन्मान देतो का? तिची योग्य काळजी घेतो का? तिच्या वयोमानाप्रमाणे हळूवार झालेल्या भावना जपायचा प्रयत्न करतो का? सर्व घराचं सांगणं कठीण. पण बहूतांश घरात ही परिस्थिती सामान्य आहे. म्हातारे झालेले आई-बाप जड होतात, आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यात त्यांची अडचण होते. त्यांची जगाचे अनुभव घेतलेली मत आपल्यासाठी निरूपयोगी ठरतं. का?

आम्ही लहान होतो त्यावेळी बालसुलभ प्रश्न विचारून तिला भंडवून सोडत होतो. आता ती उतारवयात आम्हाला विचारते. जेव्हा आम्ही चालणं शिकत होतो, आमची पावलं डगमगत होती. तेव्हा तिने सहर्ष आधार दिला. पण आम्ही आता तिच्या ''म्हातारपणाची काठी' बनत नाही. आम्हाला विविध पदार्थांचे स्वाद आवडत होते, पण आता आम्हाला तिच्या सरत्या वयाचे हट्ट पुरवायला कष्ट होतात. पाहिलं ना? परिस्थिती एक सारखीच आहे. फक्त जीवनाचे टप्पे वेगवेगळे आहेत. आधी आमचं बालपण होतं. आता तिचं आहे.

हे प्रश्न आजच्या दिवशी मांडण्याचं कारण एकच. कुणाकडूनही अशा प्रकारची चूक होत असेल तर आत्मनिरिक्षण करा. चिंतन करा आणि वेळ आहे तोपर्यंत स्वत:ला सावरा. ही सांजवात आहे. सरत्या तेलाच्या दिव्याला प्रेमाच्या हाताची सावली द्या. कारण त्यानंतर ऐकलेपणाचं उन आपल्याला झेलायचं आहे.

''आई'' ह्या मायेच्या हाकेला ''काय बाळा'' या उद्बोधनाला टिकवण्याचा प्रयत्न करा. आपलं काही चुकत असेल तर ते सहर्ष स्वीकार करा. आजचा 'मदर्स डे' यासाठीच सार्थकी लावा. जगातली प्रत्येक आई सुखी होवो. चिरायू होवी हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.


यावर अधिक वाचा :

दूध बंद आंदोलन सुरु

national news
राज्यातील शेकर्‍यांना दूध उत्पादनाचा खर्च परवडत नाही. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच ...

रेल्वेतही शॉपिंग करा, पहील्यांदाच प्रयोग

national news
आता विमानातील सुविधेच्या धर्तीवर रेल्वेतही विविध वस्तूंची विक्री केली जाणार आहे. मध्य ...

20 वर्षांनी फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक जिंकला

national news
20 वर्षांनी फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक जिंकला

ट्रम्प यांनी अनेक शाही प्रोटोकॉल तोडले

national news
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्याच अधिकृत ब्रिटन भेटीत अनेक शाही ...

अशाप्रकारे मानवी आवाजाची नक्कल करू शकतो पोपट

national news
पोपटाच्या तोंडी मानवी बोली ऐकून हा पक्षी अखेर कशामुळे असे करू शकतो, असा सवाल मनात उभा ...