मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्‍ली , सोमवार, 3 मे 2010 (16:23 IST)

झरदारींचे वक्‍तव्‍य दुर्दैवीः परराष्‍ट्रमंत्री

पाकिस्‍तानने मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवाद्यांना सोपविण्‍यास नकार देऊन दोन्‍ही देशातील शांतिप्रक्रियेला धक्‍का बसविला आहे. यामुळे पाकशी सर्व प्रकारच्‍या चर्चा थांबविल्‍या जाऊ शकतात, झरदारी यांचे हे वक्‍तव्‍य दुर्दैवी असल्‍याचे परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटले आहे.

पाकिस्‍तानच्‍या सर्वपक्षांची बैठक त्‍यांचे पंतप्रधान मोहम्‍मद अली झरदारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली यात सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर करण्‍यात आला असून गरज वाटल्‍यास भारताशी युध्‍द करण्‍यासही आम्ही तयार असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामुळे हा विषय आता गंभीर वळण घेऊ लागला आहे.