शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By भाषा|
Last Modified: इस्‍लामाबाद , सोमवार, 3 मे 2010 (16:24 IST)

पाक 20 दहशतवाद्यांना सोपविणार नाहीः झरदारी

ND
भारताने मागणी केलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी सोपविणार नसल्‍याचे पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुंबईवरील हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा कोणताही सहभाग नाही मात्र भारत जाणून-बुजून पाकवर आरोप करीत आहे असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

भारत सरकारने आपल्‍या देशात हवे असलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी पाकिस्‍तानकडे लपून बसल्‍याचा आरोप करताना त्‍यांना भारताच्‍या स्‍वाधीन करण्‍याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. या संदर्भात पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती झरदारी यांनी जाहीर केले आहे, की या 20 जणांना भारताच्‍या स्‍वाधीन कोणत्‍याही परिस्थितीत केले जाणार नाही. कारण त्‍यांच्‍या संदर्भातील सर्व पुरावे भारताने अद्यापही पाकला दिलेले नाही. या शिवाय मुंबईवरील हल्‍ल्‍यातील पाकचा हात असल्‍याचे कोणतेही पुरावे भारताने अद्याप पाककडे दिलेले नाहीत. आधी पुरावे द्या मग कारवाई करू असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. पाकिस्‍तानला हवे असणारे अनेक गुन्‍हेगार भारताकडे आहेत. समझौता एक्‍स्प्रेस स्‍फोटात सहभागी असलेल्‍या कर्नल पुरोहित यांना भारताने पाककडे सोपविल्‍यास भारतात काय प्रतिक्रिया उमटतील त्‍याच पाकिस्‍तानात या 20 जणांना सोपविल्‍यानंतर उमटू शकतात. त्‍यामुळे हे आरोपी आम्‍ही भारताला सोपवू शकत नाही असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.