शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

राजकीय नेत्यांविरोधात जनतेचा तीव्र संताप

NDND
मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर निघालेल्या दहशतवादविरोधी रॅलीत राजकीय नेत्यांवरील तीव्र राग जनेतेने व्यक्त केला. ही रॅली कुणीही आयोजित केली नव्हती. सर्व लोक स्वतःहून न बोलावता आले आणि राजकीय नेत्यांचा नाकर्तेपणा त्यांनी वेशीला टांगला.

या रॅलीत लोकांनी घेतलेले फलकच त्यांचा नेतेमंडळींविरूद्धचा राग दर्शविणारे होते. त्यांच्या या संतापातून 'मराठी ह्रदयसम्राट' राज ठाकरे हेही वाचले नाहीत.

राज ठाकरेंना उद्देशून लिहिलेल्या इंग्रजी संदेशाचा मराठी भावार्थ असा.
राज ठाकरे,
तुमच्या ऑडी या गाडीची किंमत किती?
माझ्या महाराष्ट्रीयन बंधू आणि भगिनींना मुर्ख बनविण्याचे उद्योग थांबवा.
आणि स्वतःचे काम करा.

अन्य एका संदेशात
राज ठाकरे यांच्या फोटोवर 'हरवले आहेत' असे लिहिले होते. आणि
'आपण यांना पाहिलत का?' असा मराठीत प्रश्नही विचारला होता. राज ठाकरे यांनाच उद्देशून आणखी एक फलक होता. त्यावर लिहिले होते. 'मी भारतीय आहे. आणि इथे फक्त एकच 'सेना' आहे, ज्यावर माझा विश्वास आहे, ती म्हणजे 'भारतीय सेना'.

मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी तर फारच तीव्रतेने लिहिले होते.
'मि. देशमुख डोंट प्ले अ जोकर
रिमेंबर यू आर अवर नोकर'

आणखी एका फलकावर
'इंडिया नीड्स लीडर्स नॉट डिलर्स'

असे लिहिले होते. तर अन्य एका फलकावर

NDND
'कुत्र्याने आमच्या घरी भेट दिली तरी चालेल, पण नेत्यांनी नाही' असे स्पष्ट शब्दात लिहून केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांच्यावर टीका केली होती. राजकीय नेत्यांसाठी 'बांगड्यां'ची छायाचित्रे देण्यात आली होती.

शिवाय 'डॉग्ज अँड पॉलिटिशनन्स आर नॉट अलाऊड इन धिस रॅली' असा इशाराही देण्यात आला होता.
याशिवायही काही फलक उल्लेखनीय होते.

'बार गर्ल्सना बोलवा आता
निदान त्या तरी आमचे रक्षण करतील'

'आमचे तीन शत्रू, राजकीय नेते, दहशतवादी आणि दाऊद'

मुंबईत नेत्यांविरोधात निदर्शने करणार्‍या नेत्यांना 'लिपस्टिक लावून फिरणार्‍या' बायकांची उपमा देणारे भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांच्याविरोधातही लोकांचा संताप व्यक्त झाला. गाढवावर बसवलेल्या नक्वींच्या फोटोसह
'डॉंकी डॉंकी ओल्ड अँड ग्रे,
ओपन युवर माऊथ अँड जेंटर ब्रे
लिफ्ट युवर इयर्स अँड ब्लो युवर हॉर्न
टु वेक द वर्ल्ड धिस स्लिपी मॉर्न'

अशा ओळी लिहिल्या होत्या. लोकांचा संताप कोणत्या पातळीपर्यंत पोहोचला याचे दर्शन घडविणारेही काही फलक होते.
'गांधीगिरी गेव्ह अस १९४७
नाऊ
इट्स टाईम टू ग्रॅब
एके-४७'