शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (16:23 IST)

मनसेप्रमुख राज ठाकरे आक्रमक, म्हणाले मग आमची परवानगी घ्यावी लागेल

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत योगींना प्रतिइशारा दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असल्यास आमच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रात पाऊल ठेवता येणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
 
तसेच महाराष्ट्र सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे, असे राज यांनी म्हटले आहे. भविष्यात परराज्यातील कामगारांना महाराष्ट्रात प्रवेश देताना त्यांची नोंद करावी. पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे. तर त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा, असे राज यांनी म्हटले आहे.