मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इरणींबद्दलची ती प्रतिक्रिया लाजिरवाणी: शमिना शफीक

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांचे खाते बदलल्यानंतर संयुक्त जनता दलाच्या नेत्याने दिलेली प्रतिक्रिया लाजिरवाणी असल्याची टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्य शमिना शफीक यांनी केली आहे. शफीक म्हणाल्या, ती ‍प्रतिक्रिया लाजिरवाणी आहे. जर या राजकीय व्यक्तींना काय बोलावे हे समजत नसेल तर त्यांनी शांत राहावे.
 
महिलांचा आदर करायचा सोडून या लोकांना कसे वागावे, हे देखील समजत नाही. जर नेतेच असे वागू लागले तर महिलांना कोठे जायचे? अशा प्रकारच्या वागण्यातून गुन्हेगारीची लक्षणे दिसून येतात. असे म्हणत अन्वर यांनी माफी मागावी, अशी मागणी ही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला.