गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एव्हरेस्ट सर करणार्‍या दाम्पत्याची फसवेगिरी उघड

जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणारे पोलीस दाम्पत्य दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड यांनी शिखर सर केले नसल्याचे उघड झाले आहे. नेपाळ सरकारने याची चौकशी करून ही बाब स्पष्ट केली आहे. 
 
नेपाळ सरकारच्या पर्यटन विभागाचे महासंचालक सुदर्शन ढाकल यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याचा दावा खोटा आहे. त्यांनी दिलेली छायाचित्रे खोटी आहेत. राठोड दाम्पत्याच्या एव्हरेस्टवारीवर पुण्यातील काही गिर्यारोहकांनी संशय व्यक्त केला होता. तसेच आमच्याकडे तशी तक्रार देखील केली होती. त्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली. या दोघांसोबत गेलेल्या शेरपाची चौकशी आम्ही प्रथम केली. अशा प्रकारे फसवेगिरी केल्यामुळे या दाम्पत्यावर सायबर गुह्याअंतर्गत कारवाई होऊ शकते.
 
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड यांनी 7 जूनला एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा केला होता. त्यांनी याचे फोटो देखील व्हायरल केले होते. तारकेश्वरी या मुख्यालयाच्या अ कंपनीत तर, दिनेश हे सी कंपनीत कार्यरत आहेत. गेल्यावर्षी त्यांनी शिखर सर केल्याचा निर्धार केला होता. मात्र, काही कारणामुळे ते शक्य झाले नाही. एव्हरेस्ट सर करण्यासाठी दोघांनी पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर 1 एप्रिल पासून ते दोघेही सुट्टीवर गेले होते. पण या पोलीस दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केले नसल्याचे नेपाळ सरकारच्या पर्यटन विभागाने काठमांडू येथे सांगितले.