मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दहशतवादी बुरहान ठार; अमरनाथ यात्रा स्थगित

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दीर्घ काळ चाललेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवादी बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले.
 
बुरहानसोबत ज्या दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यांचा वेगवेगळ्या चकमकीत मृत्यू झाला आहे.
 
दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर खो-यात तणावाचे आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अमरनाथ यात्राही तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. तसेच खो-यातील इंटनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.