शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 11 मार्च 2015 (11:35 IST)

‘इंडिया डॉटर’वरील बंदी टिकणार नाही : लेस्ली

‘इंडिया डॉटर’ माहितीपटावरील बंदीबाबच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होत आहे. भारतीय न्यायालये सरकारच्या हातची ‘बाहुली’ नसल्याने ही बंदी दीर्घकाळ टिकणार नाही, असा  दावा ब्रिटिश दिग्दर्शक लेस्ली उडविन यांनी केला आहे.
 
याबाबत लेस्ली म्हणाल्या,  लोकशाही मानणारा देश असणार्‍या भारतात ‘इंडिया डॉटर’सारख्या माहितीपटावर घालण्यात आलेली बंदी देशाच्या धोरणाविरोधात चित्र निर्माण करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने ही बंदी अस्थायी स्वरूपाची आहे. नागरी मूल्ये लवकरच परततील आणि बंदी हटविली जाईल, असे लेस्ली म्हणाल्या.