शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: कांकेर (छत्तीसगढ) , शनिवार, 26 एप्रिल 2008 (21:29 IST)

'युवराज' शब्द अपमानकारक- राहुल

कॉंग्रेसचे महासचिव व खासदार राहूल गांधी यांनी 'युवराज' हा शब्द अपमानकारक असून त्या नावाने पुकारण्यात येऊ नये, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या समक्ष म्हटल्याचे समजते.

38 वर्षीय राहूल गांधी यांनी आगामी निवडणुकीत आपल्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषीत करण्याच्या पक्ष निर्णयावर नाराज आहेत. सध्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनेसिंग यांचे समर्थन करताना ते सर्वात सक्षम असे पंतप्रधान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारत हा लोकशाही देश असून लोकशाही‍त युवराज शब्दाला काहीही अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसचे ई. एम. नचिअप्पन यांनी 21 एप्रिल रोजी राज्यसभेत राहूलला 'गरीबांचा युवराज' असे संबोधले होते. त्यावरून विरोधी पक्षाने राज्यसभेत हंगामा केला होता.