शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 29 एप्रिल 2008 (00:04 IST)

'सरकारने चीनसमोर शरणागती पत्करली'

तिबेटप्रश्नी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्चचिन्ह निर्माण करत भारतीय जनता पक्षाने सरकारवर चीनसमोर शरणागती पत्करल्याचा आरोप केला. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये साम्यवादी चीनच्या वाढत्या प्रभावाकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

चीनला खूश ठेवणे व डाव्यांची मनधरणी करणे यावरच सरकारचे सर्व लक्ष असल्याचा हल्ला चढवताना दडपशाहीच्या वेळी भारताने तिबेटच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची मागणी केली.

तिबेटच्या सांस्कृतिक व धार्मिक वाससा उद्ध्वस्त करण्याचे येत असताना भारताने मूक साक्षीदार राहणे योग्य नाही. तिबेटींना त्यांच्याच देशात पद्धतशीरपणे अल्पसंख्याक बनवण्यात येत असल्याकडे भाजपने लक्ष वेधले.