शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (11:18 IST)

26/11 पूर्वी मुंबईत दोनवेळा झाला हल्याचा प्रयत्न

लष्कर-ए-तोयबाने सप्टेंबर व आॅक्टोबर २००८मध्ये मुंबईत दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्न फसला आणि २६/११रोजीचा हल्ला यशस्वी झाला, अशी माहिती या हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने दिली आहे.

एलईटचा म्होरक्या हाफीज सईद व झकीर-उर-रहमान लखवी यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानात रचण्यात आलेला हा कट दोनदा अयशस्वी ठरला होता, अशी माहिती हेडलीने मुंबईतील विशेष न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविताना दिली.

आपण २६/११च्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानहून मुंबईत सात वेळा आलो होतो. या भेटीत काय करायचे आहे, याची पूर्ण कल्पना साजीद मीरने मला दिली होती. 

मुंबईत गेल्यावर महत्त्वाच्या ठिकाणांची व्हिडीओग्राफी कर, असे मीरने सांगितले होते. शिवाय २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही आपण ७ मार्च २००९ रोजी मुंबईत आलो होतो, असेही हेडलीने न्यायालयात सांगितले.