गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (14:52 IST)

आता येथे चालतील 500 च्या नोटा

नवी दिल्ली- आधी 100 आणि मग 500 च्या जुन्या नोटा पेट्रोल पंपावर बंद झाल्यावर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उद्भवत आहे की आता बँकेत जमा करण्याव्यतिरिक्त या नोटा कुठे-कुठे चालतील.
 
घरगुती एलपीजी सिलेंडरचे भुगतान करण्यासाठी, रेल्वे तिकिट करण्यासाठी, मेट्रो तिकिट आणि सरकारी बस तिकिट खरेदी करण्यासाठी 500 च्या जुन्या नोटा स्वीकार केल्या जातील.
याव्यतिरिक्त सरकारी रूग्णालय, मेडिकल शॉप्स, विजेचे बिल, पाण्याची बिल, स्कूल फीस, पोस्टपेड मोबाइल बिल, टेलिफोन बिल, प्रीपेड मोबाइल कूपन आणि केंद्रीय भंडार जसे उपभोक्ता सहकारी भंडारात 500 च्या जुन्या नोटा स्वीकार केल्या जातील. तरी 1000 च्या नोटा यातून कुठल्या स्थानांवर स्वीकार केल्या जाणार नाही.