Widgets Magazine
Widgets Magazine

लवकरच करू शकाल आधार कार्डने पेमेंट, डेबिट कार्ड, पिन नंबर आता कालबाह्य असेल

नवी दिल्ली, शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (14:04 IST)

जर सर्व काही ठीक ठाक राहिले तर लवकरच तुम्ही तुमच्या आधार कार्डचा प्रयोग वेग वेगळ्या पेमेंट करण्यासाठी करू शकता. नोटाबंदीमुळे रोख रकमेची चणचण जाणवत असल्याने सध्या प्लास्टिकमनीचा वापर वाढला आहे. डेबिट, क्रेडिट, तसेच प्रीपेड कार्डच्या माध्यमातून हे व्यवहार करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने सर्वच विभागांना ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहारांवर भर देण्याचे सूचित केले आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी नागरिकांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. ही व्यवस्था एककेंद्री असावी, यासाठी नजीकच्या भविष्यात होणारे सर्व व्यवहार प्लास्टिकमनीच्या ऐवजी आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने करण्याची केंद्राची योजना आहे. 
 
‘निती आयोगा’ने ही शिफारस केली आहे. ही शिफारस अंमलात आणली गेल्यास डेबिट, क्रेडिट कार्डांची जागा बारा अंकी आधार कार्ड घेईल. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’चे महासंचालक अजय पांडे यांच्या मते आधार कार्डच्या मदतीने व्यवहार झाल्यास त्यासाठी कोणत्याही कार्डचा किंवा पिन क्रमांकाचा वापर करण्याची आवश्यकताच भासणार नाही. अँड्रॉइडचे यूजर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून हे काम सोप्या पद्धतीने करू शकतील. ही व्यवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बंगळुरुत 5 कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त

बंगळुरु- आयकर विभागाने कर्नाटकाच्या आयटी सिटीत छापा मारला. त्या दरम्यान 5 कोटी रूपयांच्या ...

news

महाराष्ट्रातील धसई गाव ठरले देशातील पहिले कॅशलेस गाव

ठाणे- डिजीटल घेण-देणवर भर देण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नासोबतच ठाणे जिल्ह्यातील धसई गाव ...

news

विवाहीत स्त्री-पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहणे कायद्याने गुन्हा

जर विवाहीत स्त्री-पुरुषाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. ...

news

किरीट सोमय्यांची उडवली पोस्टर मधून खिल्ली

भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली ...

Widgets Magazine