शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2017 (12:39 IST)

अबू सालेमसह सात जणांचा आज फैसाला

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल शुक्रवारी विशेष टाडा कोर्ट देण्याची शक्यता आहे. पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमसह सात जणांचा यात समावेश आहे. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील १३ मुख्य ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. त्या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर ७१३ लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. सुमारे २७ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पहिल्या खटल्याचा निकाल २००७ मध्ये लागला. १२३ आरोपींपैकी १०० आरोपींना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवले तर २३४ जणांची पुराव्याअभावी सुटका केली. १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर जुलै २०१५ मध्ये अंमल करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या केसमधील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला.