testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला तर याद राखा - अजित पवार

ajit panwar 600
Last Modified मंगळवार, 18 एप्रिल 2017 (12:40 IST)
ज्यातील शेतकरी आज हवालदिल झाला आहे, म्हणून तो पेटून उठला आहे. जर कोणी या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला तर याद राखा गाठ आमच्याशी आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्या, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पिंपळगाव बसवत येथील सभेत दिला. शरद पवार
साहेब कृषिमंत्री असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले की ते थेट पवार साहेबांशी संवाद साधायचे, पवार साहेब त्वरित निर्णय घ्यायचे, या सरकारचा शेतकऱ्यांशी काही संवाद नाही, अशी टीका त्यांनी केली. आता चाल ढकल चालणार नाही. भाजपवाले तुम्हाला काही शेवटपर्यंत साथ देणार नाहीत. ते फक्त शहरी भागांचा विचार करतात, ग्रामीण भागाकडे त्यांचं लक्ष नाही. त्यामुळे आपल्याला सरकारशी संघर्ष करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
आ. विद्या चव्हाण , प्रा. कवाडे, अबू आझमी, दिपीका चव्हाण, सुनील केदार, हनुमंत डोळस, भाई जगताप, माजी आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :