शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अखिलेश यादव यांना सायकल चिन्ह

समाजवादी पार्टीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निवडणूक आयोगाने सायकल चिन्ह बहाल केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये समाजवादी पक्षात अंतर्गत यादवी टोकाला गेली होती. परिणामी नेताजी अर्थातच मुलायमसिंह यादव विरूद्ध त्यांचा मुलगा अखिलेश असा सामना रंगला होता. अखिलेश यांना त्यानंतर मुलायमसिंहांनी पार्टीतून निलंबितही केले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी अखिलेश यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी भरवर आपली ताकद पणाला लावली. त्याच अधिवेशनात अखिलेख यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्याचवेळी नक्की मुलायमसिंह आणि त्यांच्या समर्थकांनीही पक्षावर दावा केला. दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी सायकल चिन्हावर दावा केला होता.