Widgets Magazine
Widgets Magazine

अमरनाथ यात्रा बस हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा

मंगळवार, 11 जुलै 2017 (11:29 IST)

म्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा ही संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. उत्तर प्रदेशात कावड यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तर गृह मंत्रालयाचे एक पथक श्रीनगरला रवाना झाले आहे.


अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले. बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले घडवले. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक हे महाराष्ट्रातील पालघरचे आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...

news

लंडनमधील ऐतिहासिक मार्केटला भीषण आग

पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या कॅम्डेन लॉक मार्केटला भीषण ...

news

महिलांना मासिक पाळीची रजा

मुंबईमधील कल्चर मीडिया या कंपनीने मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ...

news

गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय केल ? ठोस उपाययोजना लिहून द्या

दहीहंडी उत्सवात मानवी मनोऱ्यांच्या निर्बंधांसंबधातील पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार आहे. ...

Widgets Magazine