testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पंतप्रधान व अमित शहा यांच्या वक्तव्याचा विरोधात पकोडे विकून निषेध

Last Modified बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (16:01 IST)

भाजपा सरकाने देशातील बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देऊन प्रवाहात आणणे गरजेचे असताना उलट तरुणांना पकोडे विकण्याचा व्यवसाय करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये भाजपा सरकारविरोधात तीव्र नाराजी पसरली असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष
संकेत ढवळे

यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने भाजपा नेत्यांच्या नावाचे पकोडे विकत निषेध नोंदविण्यात आला.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे रस्त्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पकोडे विक्रीचा स्टॉल उभारण्यात आला. या स्टॉलवर मोदी पकोडा १०० रुपये, अमित शहा पकोडा ५० रु., आणि देवेंद्र फडणवीस पकोडा ३० रु. तर विनोद तावडे पकोडा १० रुपये दराने विकण्यात आला.

पंतप्रधान मोदींनी भारतातील रोजगार निर्मितीच्या प्रश्‍नास उत्तर देताना म्हटले होते की जो पकोडे विकतो अशा व्यक्तीला दररोज २०० रुपये मिळतात. असे सांगून तरुणांना नोकर्‍या देण्यापासून वंचित ठेवण्याची एकप्रकारे भूमिका घेतली आहे व शिक्षित तरुणांचा एकप्रकारे अपमान केला आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेचा पकोडे विकून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, शरद क्रिडा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय कसबे, अमोल चव्हाण, अभय पासले, फैजल इनामदार, अंकुश गायकवाड, अमर मदने, गणेश भोसले, प्रसाद भोसले, विजय कदम, अनिकेत कापसे, गणेश घोडके, गौस करमाळकर, सचिन साळुंखे, बाळू ननवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...