testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भुजबळ दमानिया विरुद्ध कारवाई करणार

छगन भुजबळांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असे आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. त्यांच्या याच आरोपांवर आक्षेप घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची करणार असल्याचा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दमानिया आणि भुजबळ वाद उफाळून आला आहे.

आणि समीर भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात दारु, चिकन बरोबरच शाही बडदास्त ठेवली जाते. असा आरोप दमानिया यांनी केला. त्यासंदर्भात आज महाराष्ट्र कारागृह विभागाकडून चौकशीचेही आदेश दिले. मात्र हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असून त्यात काही अर्थ नसून फक्त बदनामी करणे या हेतूने झाले आहेत असे भुजबळ यांनी आपल्या पत्रातून केला आहे. तर दमानिया या फक्त भुजबळ यांच्या विरोधात का बोलतात असाही प्रश्न निर्माण होतोय.


यावर अधिक वाचा :