Widgets Magazine
Widgets Magazine

पाय घसरुन पडले अरुण जेटली

हरिव्दार, सोमवार, 13 मार्च 2017 (09:46 IST)

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना पाय घसरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. याबाबत प्रसारित झालेल्या वृत्तांनुसार, जेटलींच्या डोक्याला मार लागल्यानंतर ते काहीसे बेशुद्ध देखील झाले.
 
या घटनेनंतर पतंजली योगपीठातील डॉक्टरांनी जेटलींवर तातडीने उपचार केले. त्यांची तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले. पतंजली योगपीठातील डॉक्टरांनी केलेल्या उपचार आणि तपासणीनंतरच जेटली दिल्लीला रवाना झाले. भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला जेटली यांना उपस्थित राहायचे आहे. आता जेटली यांची तब्येत ठणठणीत असल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. असे असले तरी ते आजच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सहभागी होऊ शकतील की नाही याबाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.
 
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

केजरीवालांच्या ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष होण्याची संधी

गोवा विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने भलेही खाते ...

news

छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले वर्ध्याचे जवान प्रेमदास मेंढे अनंतात विलीन

छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले वर्ध्याचे जवान प्रेमदास मेंढे अनंतात ...

news

आता राष्‍ट्रपती ‘भाजप’च्याच पसंतीचाच होणार!

संसदेच्‍या या वरिष्‍ठ सभागृहात बहुमत नसल्‍यामुळे अनेक विधेयकांच्‍या मंजुरीसाठी भाजपाला ...

news

प्रीत भरारा यांची हकालपट्टी; राजीनामा दिला नाही म्हणून मला काढून टाकले: प्रीत भरारा

प्रीत भरारा यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची संधी प्रशासनाकडून देण्यात आली होती परंतु ...

Widgets Magazine