Widgets Magazine

अरुण जेटली यांचे चीनला चोख प्रत्युत्तर

Last Modified शनिवार, 1 जुलै 2017 (09:46 IST)

१९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धाची आठवण देत इतिहासापासून धडा घ्यावा, अशी धमकी देणाऱ्या चीनला भारताचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. १९६२ मधील परिस्थिती वेगळी होती. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत खूपच बदल झाला आहे. हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत जेटली यांनी चीनला सुनावले आहे. चीन ज्या ठिकाणी रस्तेनिर्मिती करत आहे ती जमीन भूतानची आहे असं भूताननंच सांगितलं आहे. भारत आणि भूतानमध्ये संरक्षण संबंध आहेत. त्यामुळं तेथे आमचे सैन्य तैनात आहेत, असंही जेटली यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :