गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 13 मार्च 2017 (09:44 IST)

केजरीवालांच्या ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष होण्याची संधी

गोवा विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने भलेही खाते खोलले नसेल किंवा  या पक्षाचे पंजाबमध्ये सरकार स्थापण्याचे स्वप्न भंगले असेल पण या दोन्ही राज्यातील पक्षाच्या मतांची टक्केवारी पाहता आम आदमी पक्ष लवकरच राष्ट्रीय पक्ष होणार आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे.
 
गोवा आणि पंजाबमधील विधानसभेच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करून जनतेचे आभार मानले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. संघर्ष सुरूच राहिल. अपेक्षित यश मिळाले नसले तरी राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू झाली असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. या दोन्ही राज्यात केजरीवाल यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले नसले तरी त्यांच्या मतांच्या टक्क्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. पण असे असले तरी उत्तर प्रदेशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पाहता आगामी काळात होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.