शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 27 मार्च 2017 (10:46 IST)

आता ट्विंकल खन्नाने साधला योगी आदित्यनाथांवर निशाणा

ट्विंकल खन्ना तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे चर्चेत आली आहे.
 
तिला योगी आदित्यनाथ यांनी महिलांवर केलेल्या विधानांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
 
ट्विंकलने योगी आदित्यनाथ यांच्या फॅशन बाबतीतही वक्तव्य केलं. योगी आदित्यनाथ सध्या फॅशन बदलत आहेत. एशियन पेंटने आता नव्या सीझनसाठी ‘भगवाच नवा ब्राऊन कलर असेल’ ही टॅग लाईन ठेवावी, असं ट्वीट ट्विंकलने केलं.
 
योगी आदित्यनाथ यांनी असं योगासन करावं, ज्यामुळे गॅस रिलीज करण्यासाठी मदत होईल, ते व्यवस्थेसाठी चांगलं राहिल, असा सल्ला ट्विंकलने दिला.