testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, 7 ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस गुजरातची असल्याची माहिती मिळाली आहे.
हा हल्ला दहशतवाद्यांनी रात्री साडे आठच्या सुमारास केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दुसरीकडे बांतिगू परिसरात पोलिसांच्या पथकावर सुद्धा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. अमरनाथ यात्रेला २९ जूनपासून सुरुवात झाली होती.


यावर अधिक वाचा :