testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अबब, भिकारी महिलेने दिले अडीच लाख रूपये मंदिराला दान

म्हैसूर येथील प्रसन्ना अंजनेया या मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या एका भिकारी महिलेने आपल्या भिकेतून मिळालेल्या पैशांची बचत केली. पुढे हीच बचत त्याच मंदिराला दान केली आहे. विशेष म्हणजे तिने मंदिराला दान केलेली ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल अडीच लाख रूपये इतकी आहे. या वयोवृद्ध महिलेचे वय ८५ वर्षे असून तिचे नाव
एम.व्ही. सीता असे आहे.

सुरूवातीला या भिकारी महिलेकडून रक्कम घेण्यास मंदिर प्रशासन तयार नव्हते. मात्र आपली देवावर श्रद्धा असून आपल्याला ही रक्कम मंदिरालाच देण्याची इच्छा असल्याचे तिने वारंवार सांगितल्यावर प्रशासनाने तिची ही मागणी मान्य केली. ती दिवसभर मंदिराच्या बाहेर बसते त्यामुळे मंदिर प्रशासन आता तिची काळजी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधीही गणेशोत्सव काळात तिने या मंदिराला ३० हजार रुपयांची देणगी दिली होती.


यावर अधिक वाचा :