Widgets Magazine
Widgets Magazine

लैंगिक छळ रोखण्यासाठी ‘शी-बॉक्स’ नवे संकेतस्थळ

बुधवार, 26 जुलै 2017 (09:11 IST)

नोकरीच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला चाप बसावा यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी-बॉक्स’ हे नवे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरुन महिलांना थेट तक्रार करता येणार आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्यांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहेत. तसेच नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचे प्रमाणही तपासणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.

या संकेतस्थळाची सुरुवात सध्या केंद्रीय कर्मचारी महिलांसाठी सुरु झाली असली तरी लवकरच याचा विस्तार करण्यात येईल आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी देखील ही सेवा सुरु केली जाणार आहेत, असे मनेका गांधी म्हणाल्या. नोकरीत महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. त्याला चाप बसावा यासाठी हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. केंद्र सरकारमध्ये सध्या 3.37 लाख महिला कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ही वेबसाईट नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नमिता कोहोक यांनी जिंकली अमेरिकेतील सौदर्य स्पर्धा

नाशिकची कन्या असलेल्या नमिता कोहोक यांनी अभिमानस्पद कामगिरी केली आहे. त्यांनी समाजसेवेला ...

news

गोवा सरकार भाकड गायी आणि बैल सांभाळणार

गोमांस वरून गोव्याचे मुख्यमंत्री वादात सापडले होते. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका ...

news

घाटकोपर इमारत दुर्घटना मृतांची संख्या १३ वर

मुंबई येथील इमारत कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ वर गेली आहे. यामध्ये ...

news

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार! (Video)

शरीरावर होणार्‍या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया सर्वात जटील समजली ...

Widgets Magazine