testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

व्हॉट्सअॅपवर लावली अपहरण केलेल्या मुलाची बोली

Last Modified शुक्रवार, 30 जून 2017 (13:06 IST)
दिल्लीमध्ये एका मुलाचं अपहरण करून त्याला जास्तीत जास्त किंमतीला विकण्यासाठी एका महिलेने त्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर अपलोड करून त्याची बोली लावली. या माध्यमातून त्या मुलाला विकण्यासाठी एक लाख ऐशी हजार रूपयांची किंमतही निश्चित झाली. विशेष म्हणजे या व्हॉट्सअॅप सेलमुळेच आरोपी महिला आणि तिच्या तीन साथिदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांना पकडलेल्या तिघांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनूसार, या तीन महिला लहान मुलांना दत्तक घेण्याच्या तसंच सरोगसीच्या रॅकेटमधील आहेत. या मुलाचं जामा मशिदीजवळून अपहरण करण्यात आलं होतं. तसंच त्या मुलाला जास्तीत जास्त किंमतीमध्ये विकता यावं यासाठी त्याला सहा वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेण्यात आलं होतं. या मुलाचा फोटो एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर बघितल्यानंतर त्या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतिने आरोपी महिलेने त्याला रघुवीर नगरमधील एका मंदिरात सोडून दिलं आणि पोलिसांना फोन करून बेवारस मुलगा दिसल्याची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत तीन महिला आणि एक पुरूषाला अटक केली आहे. राधा, सोनिया, सरोज आणि जान मोहम्मद अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.


यावर अधिक वाचा :