बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कोळसा घोटाळा: माजी सीबीआय प्रमुखांच्या चौकशीचे आदेश

कोळसा घोटाळाप्रकरणी माजी सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांच्याविरोधात चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोळसा घोटाळा प्रकरणाच्या चौकशीदरम्यान रणजीत सिन्हा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत असे न्या. एम. बी. लोकूर म्हणाले.
 
माजी सीबीआय प्रमुख एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने चौकशी करून आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केला होता. सिन्हा यांनी या घोटाळ्यातील आरोपींसोबत खासगी भेट घेतल्याचे या समितीने न्यायालयाला सांगितले. त्याच आधारे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.