शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2017 (12:46 IST)

कोंग्रेसचा नविन पक्ष अध्यक्ष निवड लवकरच ठरणार

कॉंग्रेस पक्षाने पक्षातंर्गत निवडणुकांचा कार्यक्रम पक्षाने जाहिर केला आहे . यामध्ये निवाडणूक  येत्या 16 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबर या कालावधित होणार आहे. मात्र अनेक वर्षानी यावेळी कॉंग्रेस पक्षाचा नवा अध्यक्षही निवड होणार  आहे. राहूल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली जाण्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
 
सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये राहूल गांधी हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असणार आहेत.  सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. मात्र प्रकृति आणि इतर कारणांनी त्या अनेक दिवसा पासून राजकारणातून दूर आहेत, तर कॉंग्रेस पक्षाच्या त्या  गेल्या 19 वर्षांपासून अध्यक्ष  आहेत. कॉंग्रेस अध्यक्षाची निवड 2015 पर्यंत होणे अपेक्षित होते, परंतु काही कारणांमुळे या प्रक्रियेला वेळ लागला. निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करुन अध्यक्षाची पुन्हा निवड करण्यात यावी असे सांगितले आहे. यावेळी मात्र सोनोया गांधी एक प्रकारे निवृत्त होतील आणि राहुल सूत्रे हातात घेतील मात्र ऐनवेळी प्रियांका गांधी यांचे सुद्धा नाव येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.त्यामुळे नवीन अध्यक्ष कॉंग्रेस पक्षात  पुन्हा जोम आणेल का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.