Widgets Magazine
Widgets Magazine

मंदसौर मधील स्थिती नियंत्रणात

मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या मंदसौर मध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला असून तेथे जमावबंदीचा आदेश आणि पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने तेथील स्थिती आता नियंत्रणात आली आहे असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
 
या जिल्ह्यातील दूध आणि भाजीपाला पुरवठा पुर्ववत करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व एटीएमही सुरळीत करण्यात आली आहेत असे सांगण्यात येते. दरम्यान या भागातील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पक्षाचे एक शिष्टमंडळ येथे भेट देणार होते पण त्यांना त्यासाठी पोलिसांनी अनुमती नाकारली. या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाने भगवंत मान, आशुतोष आणि संजयसिंह या नेत्यांचे शिष्टमंडळ तिकडे पाठवले आहे. तथापी त्यांनी जमावबंदीचा आदेश मोडून त्या जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अटक केली जाईल असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिला.
 
दरम्यान पोलिसांनी जाळपोळ आणि हिंसक प्रकार केल्याच्या आरोपावरून 156 जणांना अटक केली आहे. काल भरात या जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे जिल्हाधिकारी ओ. पी. श्रीवास्तव यांनी सांगितले. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा अजूनही पुर्ववत करण्यात आलेली नाही. ती पुर्ववत होण्यास वेळ लागेल असे त्यांनी नमूद केले. हिंसाचाराच्या काळात अफवा पसरू नयेत म्हणून मोबाईल संपर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सक्तमजूरी

दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ ...

news

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अनिश्चित काळासाठी उपोषण करणार

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यातील शांततेसाठी ते अनिश्चित काळासाठी ...

news

आधार कार्ड नसल्यास पॅन कार्डने रिटर्न भरा

पॅन कार्ड आधारशी जोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...

news

शेतकऱ्याशी संवादासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना

शेतकरी संपाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील ...

Widgets Magazine