गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बीफ खाणार्‍यांना दोषी मानत नव्हते सावरकर: शरद पवार

नवी दिल्ली- एनसीपी चीफ शरद पवार यांनी गोहत्येवर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेल्या वक्तव्यावर टिका करत या प्रकरणात वीर सावरकारांचे नाव घेतले आहे. सावरकर यांच्याप्रमाणे गायीची गरज नसल्यास तिचे मास खाणारा दोषी नाही, असे पवार यांनी सांगितले. उल्लेखनीय आहे की भागवत यांनी देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
पवार यांनी आपल्या हिंदी ऑटोबायोग्राफी "अपनी शर्तों पर" च्या विमोचन समारोहच्या दरम्यान म्हटले की, "स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांनी म्हटले होते की गाय उपयोगी पशू आहे परंतू तिची उपयोगिता संपल्यावर ती शेतकर्‍यांवर ओझे नसली पाहिजे. म्हणून गोहत्या करून तिची मास खाणार्‍यांना मी दोषी मानत नाही."