शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बंगळूर , शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (12:20 IST)

प्राप्तिकर विभागाकडून तब्बल 15 कोटींची रोकड, दागिने जप्त

कर्नाटकचे ऊर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांना लक्ष्य करून प्राप्तिकर विभागाने बुधवारी हाती घेतलेले छापासत्र गुरूवारीही सुरू राहिले. या छाप्यांवेळी 15 कोटींची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले.
 
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने गुजरातमधील आपल्या 44 आमदारांना कर्नाटकची राजधानी बंगळूरलगतच्या रिसॉर्टमध्ये हलवले आहे. या आमदारांच्या देखरेखीची जबाबदारी शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अशातच करचुकवेगिरीच्या आरोपावरून शिवकुमार यांना लक्ष्य करून छापासत्र घडल्याने राजकीय वादळ उठले. एखाद्या राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशातील श्रीमंत मंत्र्यांमध्ये शिवकुमार यांची गणना होते.
 
कर्नाटकमधील 2013 च्या विधानसभा निवडणुकीवेळी स्वत:च्या आणि कुटूंबीयांच्या नावे 251 कोटी रूपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. मुख्यमंत्री बनण्याची आकांक्षाही त्यांनी कधी दडवून ठेवलेली नाही.