testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Widgets Magazine
Widgets Magazine

खंडणीप्रकरणात दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक

मुंबई| Last Modified मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (13:22 IST)
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर याला आज अटक करण्यात आली. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली. एका बिल्डरला खंडणीसाठी धमकावत असल्याची इक्‍बाल विरोधात तक्रार होती. याप्रकरणी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र, ठोस उत्तर न दिल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. तो दाऊदचा लहान भाऊ आहे. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाल्यापासून दाऊद फरार आहे. भारतातून पलायन करून त्याने पाकिस्तानात आश्रय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दाऊदला ताब्यात घेण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र, त्याच्या वास्तव्याबाबत पाकिस्तानकडून सातत्याने नकारघंटा वाजवली जात आहे.
हत्या आणि सारा सहारा प्रकरणातील आरोपी

इक्‍बाल कासकर याला 2003 साली संयुक्‍त अरब अमिरातीमधून भारतात आणण्यात आले आहे. एका हत्येच्या प्रकरणामध्ये आणि सारा सहारा प्रकरणामध्येही तो पोलिसांना हवा होता. सारा सहारा ही इमारत सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आली होती. चार वर्षांनंतर कोर्टाने इक्‍बाल कासकरला या दोन्ही प्रकरणांमधून निर्दोष मुक्‍त केले होते. खंडणी प्रकरणी इक्‍बाल कासकरबरोबर अन्य दोघांचीही नावे आहेत. इक्‍बाल हा मुंबई, ठाणे, उल्हासनगर, डोंबवली आदी भागांमधील बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्यासाठी धमक्‍या देत असे. या खंडणीमध्ये तो भाऊ दाऊदच्या वाट्याचीही खंडणी मागत असे. मात्र नोटबंदी आणि रेरा कायद्यामुळे अडचणीत असलेल्या बिल्डरांना या मोठ्या रकमेच्या खंडण्या देणे अवघड होऊ लागले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तक्रारदार बिल्डरने ठाण्याचे पोलिस आयुक्‍त परमबीर सिग यांच्याकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती. इक्‍बाल कासकरवर खंडणीव्यतिरिक्‍त “मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्‍यता आहे. त्याला यापूर्वी 2015 मध्येही खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेंव्हा तो जामिनावर सुटला होता.


यावर अधिक वाचा :