testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिल्ली : मॅकडोनाल्डची 55 पैकी 43 दुकाने बंद

दिल्लीमधील मॅकडोनाल्डची 55 पैकी 43 दुकाने बंद झाली आहेत. कनॉट प्लाझा रेस्टॉरंट समूहातर्फे उत्तर आणि पूर्व भारतात मॅकडोनाल्डची रेस्टॉरंट चालवली जातात. मॅकडोनाल्ड आणि सीपीआरएल समूह 50:50 टक्के संयुक्त भागीदार आहेत. मागच्या काही दिवसांपासून मॅकडोनाल्ड आणि सीपीआरएल समूहामध्ये वाद सुरु होते. त्यातूनच रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामुळे 1700 कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. हा निर्णय दुर्देवी आहे पण सीपीआरएलतर्फे चालवण्यात येणारी 43 दुकाने बंद तात्पुरती बंद करत आहोत असे विक्रम बक्क्षी यांनी सांगितले. विक्रम बक्क्षी आणि त्यांची पत्नी सीपीआरएलच्या बोर्डावर असून, मॅकडोनाल्डचे दोन प्रतिनिधी या बोर्डामध्ये आहेत.


यावर अधिक वाचा :