गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2017 (09:51 IST)

दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलचा लिलाव होणार

नवी दिल्ली महानगरपालिकेने गुरुवारी एका मोठा निर्णय घेत ताज मानसिंग हॉटेलचा लिलाव करण्याचा निर्णय कायम ठेवला असून ली मेरिडियनचे लायन्ससही रद्द केले आहे. ताज मानसिंग हॉटेल हे इंडियन हॉटेल कंपनी लि.द्वारा चालविण्यात येते. हे हॉटेल नवी दिल्ली महानगरपालिकेने ३३ वर्षांसाठी भाडे करारावर दिले होते आणि त्याची मुदत २०११ मध्ये संपुष्टात आली होती. दरम्यान, विविध कारणांमुळे या भाडेकराराला मुदत वाढ देण्यात आली होती. एकूण ९ वेळा इंडियन हॉटेल कंपनीकडून ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने १२ जानेवारी रोजी नवी दिल्ली महानगरपालिकेला लायन्ससची तारीख वाढविणे आणि लिलावाची समीक्षा करण्यास सांगितले होते.
 
नवी दिल्ली महानगरपालिकेचे व्हाईस चेअरमन करण सिंह तंवर म्हणाले, हॉटेल ताज मानसिंगच्या लिलावाची सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे कंपनीमध्ये स्पर्धा निर्माण होईल. तसेच नवी दिल्ली महानगरपालिकेच्या मिळकतीत वाढ होणार आहे. या लिलावात अन्य कंपन्यांनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ज्या कंपनीकडून सर्वाधिक बोली लावण्यात येईल त्यांना हॉजेल ताज देण्यात येईल. तसेच ली मेरिडियनबाबत तंवर म्हणाले, ली मेरिडियनकडून नवी दिल्ली महानगरपालिकेला ५२३ कोटी रुपये देणे असल्याने त्यांचे लायन्सस रद्द करण्यात आले आहे.