testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

संसदेच्या कॅन्टीनमधल्या जेवणात सापडला कोळी

parliament canteen
Last Modified बुधवार, 19 जुलै 2017 (11:48 IST)
संसदेच्या कॅन्टीनमधल्या जेवणात कोळी सापडला. श्रीनिवासन या अधिकाऱ्याने संसदेच्या कॅन्टीनमधून जेवनाची ऑर्डर दिली होती. त्यामध्ये या अधिकाऱ्याला कोळी सापडलाय.

या प्रकारानंतर अधिकाऱ्याची तब्येतही बिघडली आहे. मंगळवारी दुपारी ही बाब समोर आली. श्रीनिवासन यांनी संसदेच्या कॅन्टीनमधून पोंगल आणि दही भाताची ऑर्डर दिली होती. हे पदार्थ खात असताना श्रीनिवासन यांना जेवणात कोळी सापडला.

संसदेच्या कॅन्टीनमध्ये दोन वर्षांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत जेवण केलं होतं. त्यामुळे ज्या कॅन्टीनमध्ये खासदारांसह पंतप्रधान जेवण करतात, त्याच कॅन्टीनमध्ये किडा सापडल्याने खळबळ उडाली आहे.यावर अधिक वाचा :