गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पगार आहे तर एटीएम मध्ये पैसे नाही, पैसे आहेत तर सुट्टे नाही

आता नागरिकांचे पगार होत आहेत. तर काही निमसरकारी कंपनीत पगार झाले आहेत. मात्र नुसते ई पेमेंट करून सर्व गरजा अजून तरी पूर्ण होताना दिसत नाहीत असे चित्र आहे.
 
नोटाबंदीचा निर्णय जाहीर होऊन तब्बल 22 दिवस उलटून गेले आहेत, मात्र पुरेशी रोकड बँक आणि एटीएममध्ये उपलब्ध नसल्यानं पगाराच्या दिवशी नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. 
 
अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैसे नसल्यानं लोकांची निराशा झाली आहे.  काही बँकांमध्ये मोजक्याच लोकांना पुरतील एवढी रक्कम होती. त्यामुळे खात्यात पगार जमा होऊनही जमाना नाखूश होता. पैसे काढले तर ते दोन हजार मग म्हणजे सुट्ट्या पैशांचा घोळ निर्माण होत आहे. ज्यांना पैसे मिळत आहेत, त्यांना बहुतेक वेळा दोन हजाराच्या नोटा हाती लागत आहेत. त्यामुळे कुणी सुट्टे देता का सुट्टे असं म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळे  पगार आहे तर ए टी एम नाही पैसे आहेत तर सुट्टे नाही अशी   स्थिती सध्या तरी पहायला मिळत आहे.