मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीला उत्तर द्या: निवडणूक आयोग

‘केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या’, असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.  मात्र, यानंतर तीनच दिवसात 5 राज्याच्या निवडणुका होत असल्यानं अर्थसंकल्प पुढे ढकलला जावा. अशी मागणी विरोधकांकडून केली जाते आहे.

अर्थसंकल्प कधी सादर करायचा किंवा त्याच्या तारखेत बदल करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसल्याचं याआधीच आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, आता आयोगानं केंद्र सरकारला अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं बजावलं आहे.