Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

‘पप्पू’ शब्दाच्या वापरावर निवडणूक आयोगाची बंदी

election commission
Last Modified बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (16:35 IST)

गुजरातमध्ये

निवडणूक
प्रचारात
‘पप्पू’ शब्दाच्या
वापरावर
निवडणूक आयोगाने
बंदी घातली आहे.
त्यामुळे
भाजपला आपल्या प्रचारात ‘पप्पू’ शब्दाचा वापर करता येणार नाही.
सामान्यत: पप्पू या शब्दाचा वापर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी वापरला जातो. आता निवडणूक आयोगाने हा शब्द आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अनेक पत्र लिहून या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बीबी स्वाईन यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या मीडिया समितीने या शब्दावर आक्षेप घेतला आहे. भाजपच्या गुजरात युनिटने 31 ऑक्टोबर रोजी एका जाहिरातीची स्क्रिप्ट मीडिया समितीकडे पाठवली होती.

भाजपच्या एका जाहिरातीत दुकानात आलेल्या एका सामान्य व्यक्तीसाठी ‘पप्पू’ शब्दाचा वापर करण्यात आला आहे. ‘सर, पप्पू भाई आए लगते हैं’ असं वाक्य या जाहिरातीत असून त्यात पप्पूचा चेहरा मात्र दाखवलेला नाही. मात्र मीडिया समितीने यावर आक्षेप घेतला आहे.
दुसरीकडे पक्षाच्या कोणत्याही जाहिरातीत एखाद्या व्यक्तीशी संबंधित शब्दाचा वापर केलेला नाही, असं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे.यावर अधिक वाचा :