testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नोटबंदी : आता 4500च्या जागेवर 2000 रुपयेच बदलू शकता, ह्या आहे 8 नवीन घोषणा

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (12:19 IST)
कॅश क्रंचवर सरकारने आज शेतकर्‍यांना फार मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी आठवड्याभरात 25 हजार रुपये काढू शकतात. ज्यांच्या घरी लग्न आहे ते 2.5 लाख रुपये काढू शकतात. तसेच शुक्रवारापासून 4500च्या जागेवर 2000 बदलून देण्यात येतील.

1. उदयापासून (१८ नोव्हेंबर) बँकेतून पैसे बदलून आणण्याची मर्यादा ४५०० ऐवजी होणार २००० रुपये बदलू शकता ज्याने जास्तीत जास्त लोकांना आपल्या 500 आणि 1000च्या नोटा बदलण्याची संधी मिळेल.

2. लग्नसमारंभासाठी बँकेतून २.५ लाखापर्यंतची रक्कम काढता येणार, मात्र त्यासाठी KYC बंधनकारक.

3. शेतकऱ्यांना खतं-बियाणं, शेतीसंबंधीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या रकमेतून आठवड्याला २५ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे

4. भाज्यांचे थोक व्यापारी आता 50 हजार रुपयांपर्यंत काढू शकतात.

5. ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या सामानांची किंमत चेक किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळाली आहे तर ते आठवड्यात 25 हजार रुपये काढू शकतात.

6. फसलं विम्याचा हफ्ता जमा करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ वाढवण्यात आला आहे.

7. कर्मचारी (ग्रुप सी) दहा हजार रुपये पर्यंतीचा पगार एडवांस काढू शकतात. हे पुढच्या महिन्यात त्यांच्या खात्यात मॅनेज करण्यात येईल.

8. महत्त्वाचे म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांना बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बँक आणि एटिएमच्या बाहेर पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. लोक रात्री बँकेसमोर जाऊन बसून जातात ज्याने ते खर्चासाठी पैसे काढू शकतील.


यावर अधिक वाचा :