शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पतंगीसाठी वापरला जाणार्‍या काचयुक्त मांजावर बंदी

राष्ट्रीय हरित लवादाने पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काचयुक्त मांजावर अंतरिम बंदी लावली. या मांज्यातील काच आणि धातूच्या पावडरचे वेष्टन असल्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे लवादाचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठाने सांगितले. 
 
पतंगासाठीच्या मांजामुळे पक्षी व प्राण्यांसह मानवाच्या जीवितासही धोका निर्माण होत असून दरवर्षी यामुळे अनेकांचे जीव जातात. याआधी वरिष्ठ वकील संजय हेगडे, वकील शदान फरसात यांनी पेटाच्या वतीने मांजावर बंदी लादण्यासाठी लवादाकडे याचिका दाखल केली होती.