testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जीएसटीसाठी हॉटेल लवकर बंद होणार

Last Modified शुक्रवार, 30 जून 2017 (13:01 IST)

शनिवार, 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने आज (30 जून) रात्री साडेअकरापासून रात्रभर मुंबईतील हॉटेल बंद असतील. नेहमी


बरेचसे रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजता बंद होतात. पण शुक्रवार, जरी तो धंद्याचा दिवस असला तरी रेस्टॉरंट रात्री 11.30 वाजता बंद होणार आहे किंवा मध्यरात्रीपर्यंतच ऑर्डर स्वीकारल्या जातील.
शनिवारी सकाळी सर्व रेस्टॉरंटमध्ये जीएसटीनुसार दर आकारले जाणार आहेत.
काही तांत्रिक अडचणी आहेत. जीएसटी सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी सिस्टम रिबूट केल्या जाणार आहेत. हे सॉफ्टवेअर योग्य प्रकारे लागू व्हावं, यासाठी शुक्रवारी 12 वाजण्याआधी हॉटेल बंद करावं लागेल, असं मुंबईतील एका रेस्टॉरंट मॅनेजरने सांगितलं.यावर अधिक वाचा :