Widgets Magazine

चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली प्रसुती

गुजरात अमरेलीमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे. महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली होती. नंतर तिला अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. त्यावेळी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर अॅम्ब्युलन्सला सिंहाच्या कळपाने घेरलं. त्या सिंहाच्या कळपात 11-12 सिंह होते.
108 क्रमांकाच्या इमरजन्सी अॅम्ब्युलन्स सेवेच्या अमरेली जिल्हा प्रमुख चेतन गढिया यांनी सांगितलं, आम्ही गाडीला थांबवून त्या सिंहांना हटविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण सिंहाचा तो कळप तिथून हालायचा तयारीत नव्हता. त्याचवेळी महिलेला प्रसुती वेदनेसह रक्तस्त्राव व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी अॅम्ब्युलन्समध्येच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला.

कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन 25 मिनिटांमध्ये त्या महिलेची प्रसुती करण्यात यश मिळवलं.


यावर अधिक वाचा :