शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मेडिकल साइंसमध्ये ऐतिहासिक यश, 35 किमी लांबून रोबो‍टद्वारे हार्टचे ऑपरेशन

अहमदाबाद- मेडिकल साइंसमध्ये डॉक्टरांनी ऐतिहासिक यश मिळवले आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टर सुमारे 35 किमी लांब होते आणि रुग्ण हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये. डॉक्टरांनी रोबोटद्वारे रुग्णाच्या हृद्यावर शस्त्रक्रिया केली.
 
देश आणि विश्वातील प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. तेजस पटेल यांनी दुनियातील पहिल्या इन ह्युमन टेलीरोबोटिक ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पाडले. हे दुनियातील प्रथम परक्युटेनियस कोरोनरी इंटरवेंशन आहे, जे कॅथरायझेशन लॅबच्या बाहेरहून करण्यात आले आहे. असे हे विश्वातील प्रथम ऑपरेशन असल्याचे डॉ. पटेल यांचा दावा आहे.
 
डॉक्टर तेजस पटेल यांनी स्वामीनारायण मंदिर अक्षरधाम येथून अहमदाबादच्या एपेक्स हार्ट इंस्टिट्यूटमध्ये रुग्णाची टेलीरोबोटीक टेक्‍नीकने हार्ट सर्जरी केली. येथे ऑपरेशन होत असताना इतर डॉक्टर्स रुग्णासोबत उपस्थित होते. पूर्ण सर्जरी इंटरनेटद्वारे करण्यात आली. डॉक्टर तेजस पटेल यांच्याप्रमाणे ह्या तांत्रिकीमुळे मेडिकल साइंसमध्ये मोठा बदल घडेल.
 
ऑपरेशन करून रुग्णाच्या हृदयात वॉल्व लावण्यात आला. पूर्ण ऑपरेशन एका रोबोटद्वारे करण्यात आलं. डॉ. पटेल लांबून ऑपरेशन संचलित करत होते.
 
पद्मश्रीने सन्मानित डॉ. तेजस पटेल यांच्याप्रमाणे या तांत्रिकीमुळे हार्ट सर्जरीचा खर्च 40 ते 50 हजार पर्यंत वाढू शकतो परंतू पूर्णपणे याचा वापर सुरू झाल्यावर किंमत कमी होईल कारण एक्सपर्ट डॉक्टर केवळ कॉम्प्युटर आणि रोबोटच्या मदतीने ऑपरेशन केले जाईल.