testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आता गायींसाठी हायटेक पार्लर

हिसार- लाला लाजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या प्रजातींमध्ये सुधारणा आणण्यासाठी व दुधाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून संशोधन सुरू केले आहे. एवढेच नाही तर हरियाणातील पहिले हायटेक गाय फार्म प्रकल्पावरही काम सुरू करण्यात आले आहे. येथे गायींना आंघोळ घालण्यापासून ते त्यांना मसाज करण्यापर्यंत व स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने यंत्रांच्या सहाय्याने सर्व देखभाल करण्‍यात येणार आहे. एका प्रकारे गायींसाठी हे हायटेक मसाज पार्लर असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रणालीला ऑटोमॅटिक पार्लर असे नाव देण्यात येणार आहे. यंत्रांद्वारे येथे पशूंचे दुध काढण्यात येणारे व गरजेनुसार त्यांना चाराही घालण्यात येईल. हे सर्व कार्य कम्प्युटरच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत. लाला लाजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाच एनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग डिपार्टमेंट प्रमुख डॉ. ए. एस यादव यांनी सांगितले की या हायटेक गाय फार्मसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 3 कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे.


यावर अधिक वाचा :