testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पत्नीचा डेबिट कार्ड पती वापरू शकत नाही

जर आपण ही आपल्या पती, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणीला आपला पिन नंबर देऊन एटीएममधून पैसे काढण्यासाठी सांगत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. बंगळूरु रहिवासी एक महिलेने आपल्या पतीला एटिएम कार्ड देऊन पैसे काढण्यासाठी पाठवणे महागत पडले.
असे आहे पूर्ण प्रकरण

14 नोव्हेंबर 2013 ला बंगळूरुच्या मराठाहल्ली क्षेत्रातील रहिवासी वंदना हिने पती राजेशला आपलं एसबीआय एटिएम कार्ड देऊन 25,000 रुपये काढण्यासाठी पाठवले. त्यावेळी वंदना प्रसूती रजेवर होती. नवर्‍याने पैसे काढण्यासाठी कार्ड स्वाइप केले पण पैसे निघाले नसून रसीद मिळाली.

राजेशने एसबीआयच्या कॉल सेंटरवर फोन करून पूर्ण घटना सांगितली. 24 तासाने पैसे रीफंड झाला नाही तेव्हा त्याने एसबीआय ब्रांचमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. परंतू त्याला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा एसबीआयने काही दिवसाने हे म्हणत केस बंद केला की व्यवहार बरोबर होते आणि कस्टमरला पैसा मिळून गेला आहे.
नंतर राजेशने एटिएममध्ये लागलेले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, ज्यात राजेश मशीन वापरत असताना दिसत आहे, परंतू पैसा निघाला नाही. सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार केल्यावर बँकेच्या अन्वेषण समितीने हा तर्क देत मागणी नाकारली की फुटेजमध्ये खातेदार वंदना दिसत नाहीये. बँकेने स्पष्ट रूपात म्हटले की ‘पिन शेअर केला गेला म्हणून केस बंद’. खरं तर, बँकेद्वारे दिलेले डेबिट/एटिएम कार्ड नॉन-ट्रांसफरेबल असतं, याचा अर्थ आपण आपले कार्ड इतर कोणालाही वापरायला देऊ शकत नाही.
यानंतर वंदनाने 21 ऑक्टोबर 2014 ला उपभोक्ता फोरम चे दार ठोठावले. वंदनाने आपल्या तक्रारीत म्हटले की अलीकडेच तिने मुलाला जन्म दिला होता आणि ती बाहेर जाण्याच्या परिस्थितीत नव्हती म्हणून तिने नवर्‍याला एटिएमहून पैसे काढण्यासाठी पाठवले. परंतू पैसे तर निघाले नाही केवळ रसीद मिळाली.

वंदनाची मागणी होती की एसबीआयने तिचे 25 हजार रुपये परत केले पाहिजे परंतू बँकेने आपल्या नियम दर्शवत म्हटले की आपले पिन नंबर शेअर करणे नियमांचे उल्लंघन आहे. सुमारे साडे तीन वर्षानंतर 29 मे 2018 ला कोर्टाने आपल्या निर्णयात बँकेचा तर्क योग्य असून वंदना स्वत: जाण्यात सक्षम नव्हती तर सेल्फ चेक किंवा अधिकार पत्र देऊन पतीला पैसा काढण्यासाठी पाठवत शकत होती असे म्हटले. कोर्टाने हा आदेश देत केस संपवला.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

सूरतच्या एका कॉम्प्लेक्समध्ये आग लागली, 12 लोकांचा मृत्यू

national news
गुजरातच्या सूरतमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्यामुळे शुक्रवारी एका शिक्षकासह 12 ...

मोदींनी अडवाणी- जोशी यांच्याकडून आशीर्वाद घेतला

national news
सतराव्या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष ...

कुठे आहे मोदी यांच्या विजयाचे शिल्पकार अरुण जेटली

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाचे चक्रव्यूह तोडत लोकभसा निवडणुकीत 303 जागा ...

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी झाकीर मुसा ठार

national news
जेके- भारतीय लष्कराला हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसा याला ठार मारण्यात यश ...

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) सायंकाळी केंद्रीय ...