testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पत्नी गर्भधारणेसाठी तयार नाही,पती जबरदस्ती करु शकत नाही

Last Modified शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (10:55 IST)

पत्नी गर्भधारणेसाठी तयार नसल्यास पती तिला जबरदस्ती करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशाच प्रकारचा निर्णय पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सोबतच

गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही असे स्पष्ट केले आहे.

पंजाब-हरियाणा उच्च न्यायलयात 2011 साली अनिल कुमार मल्होत्रा या व्यक्तीने याचिका दाखल केली होती. त्यानुसार, गर्भपात केल्याप्रकरणी मल्होत्रा यांनी त्यांची पत्नी सीमा मल्होत्रा, डॉक्टर आणि पत्नीच्या माहेरच्या मंडळींकडून 30 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी उच्च न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय दिला होता.

2011 साली पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले होते, “स्त्री ही काही मशीन नाहीत, ज्यातून एखादा कच्चा माल टाकून प्रॉडक्टची अपेक्षा कराल. बाळाला जन्म देण्यासाठी महिला मानसिकरित्या तयार असली पाहिजे.”सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.यावर अधिक वाचा :