Widgets Magazine
Widgets Magazine

हैदराबाद विमानतळ जगात सर्वोत्तम

मंगळवार, 7 मार्च 2017 (16:57 IST)

hydrabad international airport

भारतातील हैदराबाद विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) विमानतळावर मिळणा-या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी -एएसआय) आणि विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे ही निवड केली जाते.  याद्वारे 50 लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या यादीत हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमातळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. वर्षाला चार कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिल्या स्थानी दक्षिण कोरियातील विमानतळाचा नंबर लागला आहे. विमान कंपन्या, हाऊसकिपींगच्या कर्मचा-यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आम्हाला पहिले स्थान पटकावता आले. केंद्र सरकार, सीआयएसएफ, विमान कंपन्यांना अशी प्रतिक्रिया जीएमआर हैद्राबाद आंतराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ एसजीके किशोर यांनी दिली. लवकरच विमानतळाच्या विस्ताराचे काम सुरु करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला

देशातील पहिले कागदविरहित (पेपरलेस) सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला मिळाला. ...

news

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे

हत्या, दहशतवादी कारवाया यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे ...

news

साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा यांना न्यायालयाने ...

news

रिंकू पण दहावीच्या परीक्षेसाठी हजर

दहावीची परीक्षा सुरु झाली असून 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूनेही परीक्षेला हजेरी ...

Widgets Magazine